Label

संक्षिप्त इतिहास

भारत हा विविध धर्म, जाती, जमाती व अनेक भाषांचा देश आहे. समाजातील विविधता व सर्व जाती, जमातींची सांस्कृतीक पंरपरा कायम ठेवण्याकरिता सर्व नागरिकांना संरक्षण देणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया मागासलेल्या वर्गांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी अनुकूल धोरण व कार्यक्रम ठरविणे गरजेचे आहे.

भारताच्या संविधानामध्ये धार्मिक, अल्पसंख्याकांसाठी खालील प्रमाणे संरक्षक उपाययोजनांची तरतूद करण्यात आली आहे.

अनुच्छेद 25 - व्यवसाय, व्यवहार आणि धार्मिक प्रसार करण्याचे स्वातंत्र्य. अनुच्छेद 26 - धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य.

अनुच्छेद 28 - विवक्षित शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य.

अनुच्छेद 29 - अल्पसंख्याक समाजाच्या हितसंबधांचे संरक्षण.

अनुच्छेद 30 - अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचे अधिकार.

राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोग, अधिनियम, 2004 अन्वये राज्यातील अल्पसंख्याकांकडून चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांना धार्मिक / भाषिक अल्पसंख्याक दर्जाची मान्यता प्रदान करण्यासाठी राज्य शासनाने अप्पर मुख्य सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.

दि. 17 फेब्रुवारी, 1992 रोजी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची धोरणात्मक निर्णयाद्वारे तीन वर्षांकरिता प्रथम स्थापना करण्यात आली होती. दि. 21 जून, 1995 रोजी राज्य अल्पसंख्याक आयोगाची 3 वर्षांची मुदत संपली.

  • तदनंतर राज्यातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या हितांचे संरक्षण व भारताच्या संविधानामध्ये अल्पसंख्याकांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याकरिता राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या धर्तीवर शासन निर्णय क्र. एलएमएन/प्र.क्र.-49/35, दि.04.02.2000 अन्वये राज्य अल्पसंख्याक आयोगाची पुनर्स्थापना करण्यात आली.
  • दि.15 जुलै, 2000 च्या शासन निर्णयानुसार तीन वर्षांकरिता श्री.मोहम्मद अमीन खंडवाणी यांची आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
  • तीन वर्षांच्या कालावधीसाठी राज्य शासनाने पुनर्घुटित केलेल्या राज्य अल्पसंख्याक आयोगाची मुदत दि.03 फेब्रुवारी, 2003 रोजी समाप्त झाली.
  • शासन निर्णय क्रमांक एलएमएन 1099/सीआर 39/99/35, दि. 31 मार्च, 2003 अन्वये आयोगास दि.04 फेब्रुवारी, 2003 पासून पुढे दोन वर्षांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली.
  • महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम 2004 (सन 2005 चा अधिनियम क्र.31) दिनांक 08 ऑगस्ट, 2005 च्या शासन अधिसूचनेन्वये आयोगास सांविधानिक दर्जा प्रदान करण्यात आला आहे.
  • शासन अधिसूचना क्र.राअआ-2005/89/प्र.क्र.19/2005/35, दिनांक 04 ऑगस्ट 2006 अन्वये राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्ष पदी श्री. मोहम्मद नसीम सिद्यीकी यांची आणि उपाध्यक्ष पदी डॉ.अब्राहम मथाई यांची पाच वर्षांकरीता नियुक्ती करण्यात आली. दि.03 ऑगस्ट, 2011 रोजी मुदत संपुष्टात आली.
  • शासन अधिसूचना क्र.राअआ/2008/विकाक 112/प्र.क्र.263/08/का.1, दि.30 जलै, 2009 अन्वये पारसी समाजाचे प्रतिनिधी म्हणून श्री. दिनशॉ रूसी मेहता यांची पदग्रहण केल्याच्या दिनांकापासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी महारष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • शासन अधिसूचना क्र.अविवि-2009/प्र.क्र.239/09/का.9, दि.28 ऑगस्ट, 2012 अन्वये राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्ष पदी श्री.हकीम अब्दुल मुनाफ अब्दुल जब्बार यांची पाच वर्षांकरीता नियुक्ती करण्यात आली.
  • शासन अधिसूचना क्र.अविवि राअआ-2012/प्र.क्र.35/12/का-9 दि.05 ऑगस्ट, 2013 अन्वये राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या उपाध्यक्ष पदी श्रीमती जेनेट डिसूझा यांची तसेच राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी श्री.सय्यद अली अशरफ, डॉ.मुमताज सलीम सय्यद, डॉ.दत्तात्रेय चोखा गायकवाड, श्री. सुरजितसिंग खुंगर यांना पाच वर्षांकरीता नामनिर्देशित करण्यात आले.
  • शासन अधिसूचना क्र.राअआ-2012/प्र.क्र.35/12/का-9 दि.10 सप्टेंबर, 2014 अन्वये राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी श्री.रावसाहेब जिनगोंडा पाटील, श्री.गुलजार आझमी, श्री.मजीद कुरेशी, श्री.लियाकत अन्सारी यांना पाच वर्षांकरीता नामनिर्देशित करण्यात आले.
  • शासन अधिसूचना क्र.राअआ-2012/प्र.क्र.160/1/14/का-9 दि.15 जानेवारी, 2015 अन्वये उपरोल्लेखित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्‍यांच्या नियुक्त्या रद करण्यात आल्या.
  • शासन अधिसूचना क्र.राअआ-2012/प्र.क्र.160/1/14/का-9 दि.15 जानेवारी, 2015 अन्वये राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्ष पदी श्री. मोहम्मद हुसेन खान यांची यांची पाच वर्षांकरीता नियुक्ती करण्यात आली.
  • शासन अधिसूचना दि.4 जुलै, 2017 अन्वये श्री. मोहम्मद हुसेन खान यांची नियुक्ती रद करण्यात आली.

    अल्पसंख्याक विकास विभाग‍ अधिसूचना क्रमांक अविवि.2017 /प्र.क्र.133 / का-9 दि.4 सप्टेंबर, 2018 अन्वये महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्ष पदावर श्री. हाजी अरफात शेख यांची तसेच उपाध्यक्ष पदावर श्री. जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांची पाच वर्षांकरीता नियुक्ती करण्यात आली आहे.